धाराशिव (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या, धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपती म्हणून गणल्या गेलेल्या, गवळी गल्लीतील, श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक व ज्वलंत समस्येवर धाराशिव जिल्ह्यात हलते देखावे समाज प्रबोधन करणारे एकमेव मंडळ. 64 वर्षापासून मूर्तिकार चित्रकार गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेले व एसटी महामंडळातील लेखा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी, व्हॉलीबॉल चे राष्ट्रीय खेळाडू बिना साच्याच्या बोटाच्या कलेतून मुर्त्या बनविणारे काशिनाथ दिवटे व त्यांच्या सहकारी यांनी हलते देखावे बिना मानधन व कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता स्वयं स्फूर्तीने आजही कार्यरत असणारे असे एकमेव कार्यकर्ता व मंडळ आहे.

दरवर्षी एक उद्दिष्ट ,ध्येय व थीम घेऊन कार्य करीत आले आहे. यावर्षी व्यसनमुक्त युवक व नशा मुक्त भारत असे थीम घेऊन कार्य केले आहे .यापूर्वी ऑपरेशन सिंदूर ,मराठी भाषा अभिजात दर्जा ,डिजिटल युग येऊ द्या भ्रष्टाचार हटवूया, कोरोना मुक्त महाराष्ट्र ,कारगिल विजय, या थीम द्वारे इ. समाज प्रबोधनाचे कार्य. 

 मतिमंद ,गतिमंद, अपंग, मूकबधिर , निराधार मुलींचा,या दिव्यांगांचा गौरव व सन्मान व मदतनिधी देण्यास तत्पर, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जात असलेल्या, धाराशिव जिल्ह्याचे व महाराष्ट्रातील गुणवंत, यशवंत, किर्तीवंत, आपापल्या विविध क्षेत्रात गौरव स्थान मिळवलेले व्यक्तिमत्वांचा सन्मान .

 19 64 पासून महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती, महापूर ,भूकंप, संकट इ. संकट वेळी मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मंडळाने निधी पाठवून यथाशक्ती मदत करीत आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी पाठवण्याची आजतागायत ही परंपरा कायम टिकवली आहे. मंडळाच्या गणेशोत्सवाच्या या कार्यक्रमांमध्ये 

श्री गणेशाच्या प्रतिष्ठापणेपासून भारताची लोकशाही मधील जीवन व माणुसकीचे नाते, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणाऱ्या भारतीय राज्यघटना संविधान संहितेची, पूजनेपासून विविध धर्मग्रंथांची पूजा व  श्री ची प्रतिष्ठापना केली जात असलेली ही परंपरा टिकवून ठेवलेली आहे.

 मंडळ श्री च्या प्रतिष्ठापणे पासून ते विसर्जन व वर्षभर विविध कार्यक्रम उपक्रम मुलं- मुली, युवक  युवती यांच्या सुप्त कलागुणाला विकसित करणारे कार्य करीत आले आहे.  मंडळ स्त्रीभ्रूणहत्या रोखा, मुली वाचवा मुली शिकवा, मुलगी शिकली देशाची प्रगती झाली, बालविवाह रोखा, मंडळ शासकीय महिला रुग्णालयामध्ये प्रसूतीपूर्वी ज्या महिलांना मुली आहेत व आज मुलगी झालेली आहे ती आनंदाने स्वीकारावी. म्हणून गणेश उत्सवाच्या कालावधीत महालक्ष्मी येण्याच्या दिवसापासून ते लक्ष्मी विसर्जनाच्या पर्यंत ज्या महिला प्रसूती झाल्या त्या महिलांचा व बालिकेचा सन्मान करणारे पालिका जन्मोत्सव साजरा करणारे मंडळ गणले गेले आहे. धाराशिव जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा ,विद्यार्थीनीचा ,क्रीडा नैपुण्य असणाऱ्या मुलींचा व विविध क्षेत्रातील धाराशिव जिल्ह्याचे नाव उज्वलते कडे घेऊन गेलेल्या या महिलांचा सन्मान केला जातो .

महिलांच्या समूह नृत्य, भजन कीर्तन ,पाककला, सेवावृत्ती, कौटुंबिक आपत्तीस बाजूस सारून कौटुंबिक व सामाजिक निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करणारे मंडळ   

1964 पासून मंडळ पारंपारिक वाद्य हलगी, ढोल, ताशा, बुलबुल, संबळ इत्यादींच्या नाद व आवाज यांच्या जोरावर दीडशे दोनशे मुला मुली लेझीमचा खेळ खेळत आले आहे व महाराष्ट्राची सांस्कृतिक व ग्रामीण भागातील प्राचीन लोक कला आजही जोपासली केली आहे . महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये चेन्नई विजयवाडा आंध्र प्रदेश अलाहाबाद प्रयागराज इत्यादी ठिकाणी शासनाच्या वतीने लेझीम महाराष्ट्राची लोककला नऊ ते दहा दिवस सातत्याने सांस्कृतिक महोत्सवांमध्ये दाखवण्याची संधी मिळाली.

डॉल्बी किंवा डीजे लावून  हिडीस किंवा धांगड धिंगाणा  नाच केला गेलेला नाही .या मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण महाराष्ट्राच्या व समूह लोक कला परंपरेला कायमचं जोपासण्याचे कार्य करणाऱ्या या मंडळाच्या कार्याची दखल . व 62 वर्षाच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे तालुका व जिल्हा पातळीवरील प्रथम मानाचा पुरस्कार सांस्कृतिक मंत्री आशिष्य शेलार व उपसचिव राऊत यांच्या शुभहस्ते देऊन मंडळाचे कार्य महाराष्ट्र राज्याच्या बाहेर ही पोहोचवण्याचे कार्य शासनामार्फत झाले गेले. यावर्षीचा कार्यक्रम गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय=राष्ट्रीय पातळीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न या गणेशोत्सव राज्य महोत्सव च्या माध्यमातून केले गेले.

महाराष्ट्र राज्यातून आलेल्या विविध जिल्ह्यातील इतर गणेश मंडळामध्ये धाराशिव गवळीगल्लीतील मंडळ आकर्षक वेशभूषा व गणपती बाप्पा मोरया छत्रपती शिवाजी महाराज की जय आई राजा उदो उदो जय भवानी जय शिवाजी इत्यादी घोषणाने वातावरण दम दमून गेले होते .महाराष्ट्राच्या पोशाखात भगवे फेटे व मंडळाचे भगवे शेले व पांढरा नेहरू शर्ट व पांढरी पॅन्ट यातून गेली 62 वर्षाच्या या परंपरेला एक वेगळी झळाळी दिसली व त्याचा कौतुक संयोजकांनी आपल्या भाषणातून केले. या बक्षीस वितरणाच्या सोहळ्यामध्ये एकमेव धाराशिवचे गणेश मंडळ उठावदार शिस्तबद्ध, एकजूट ,एकात्मता, एक गणवेश दिसून आले व 40 गणेश सेवक, गणेश भक्त, गणेश दूतांच्या उपस्थितीत पारितोषिक स्वीकारले गेले. स्वर्गीय नाना पाटेकर यांच्या एक नाट्यछटातून अभिवादन केले गेले व गणेश स्तुतीच्या विविध गाण्यावर 50 मुला-मुलींचा समूह नृत्यांचा 30 मिनिटाचा कार्यक्रम सादर करून आभार आणि कार्यक्रम समारोप झाला.

 
Top