परंडा (प्रतिनिधी)- काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या स्वर्गवासी वडिलांबद्दल अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय वक्तव्य करून सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांच्या आणि काँग्रेसच्या संस्कृतीचे प्रदर्शन केले असून अत्यंत अशोभनीय वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी परंडा शहर व तालुक्याच्या वतीने परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले. 

काँग्रेस पक्षाने सतत मोदीजी आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल अपशब्द काढले आहेत. कधी त्यांच्या आईंबद्दल अपशब्द वापरले, कधी त्यांना 'मौत का सौदागर' म्हटले, तर कधी 'चायवाला' म्हणून त्यांच्या गरीबीचा उपहास केला. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष दररोज अशोभनीयतेच्या सीमा ओलांडत आहे.

गेल्या 12 वर्षांत सतत मिळणाऱ्या निवडणूकांतील पराभवाने काँग्रेस पक्षात हताश आणि निराशा इतकी वाढली आहे की, आता त्यांच्याकडे ना कोणती धोरणं शिल्लक आहेत, ना कोणता मुद्दा, फक्त शिवीगाळाचे राजकारण शिल्लक आहे. 

जेव्हा-जेव्हा काँग्रेसने मोदीजी किंवा त्यांच्या कुटुंबावर घृणास्पद टिप्पण्या केल्या आहेत, तेव्हा-तेव्हा जनतेने काँग्रेसला सडेतोड उत्तर दिले आहे. वयोवृद्ध असलेल्या खर्गे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष गौतम लटके, प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, नप. उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, सुखदेव टोंपे, विकास कुलकर्णी, साहेबराव पाडुळे, तुकाराम हजारे, अनिल पाटील, प्रदीप लोंढे, हरी शिंदे, डॉ.अमोल गोफणे, ॲड. भालचंद्र औसरे, परसराम कोळी, जोतीराम गिरवले, दिपक गायकवाड, तानाजी घोडके, तुषार नेटके, नागेश गर्जे, शिवाजी पाटील, नागेश शिंदे, गिरीधर कोलते, विठ्ठल तिपाले, रणजित मिस्कीन, तानाजी गायकवाड, विष्णू सांगडे, यशपाल बनसोडे, रामदास गुडे, किरण कवटे, योगेश डांगे, जयंत सायकर, अजिम हन्नुरे, धनंजय काळे, संतोष गायकवाड, गौरव पाटील, मनोहर पवार, अमर ठाकूर, व्यंकटेश दिक्षित, आकाश मदने, पांडुरंग मुसळे, जयंत भातलवंडे, मिलिंद शिंदे महिला मोर्चा शहराध्यक्षा ज्योतीताई भातलवंडे, शुभदा शेलार तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top