धाराशिव (प्रतिनिधी)-पदवीधर मतदारसंघात एकही नोंदणी न करणारे मराठवाड्यासारख्या दहा हजार गावांच्या अफाट मोठ्या मतदारसंघात कसलाच जनसंपर्क नसणारे अचानकपणे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे, अफवा पसरवून व अपप्रचार करून केविलवाणेपणे मते मागायला लागलेत. अशा विरोधी पक्षातील उमेदवाराला पराभूत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव जिल्हाध्यक्ष सचिन तावडे यांनी केले.
ते भागीरथीबाई लाटे हायस्कूल व डॉ.पद्मसिंह पाटील प्राथमिक विद्यामंदिर धाराशिव येथे शिक्षक संवाद मेळाव्यात मराठवाडा पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना,रिपाई व महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा समाजसेवा मंडळ धाराशिव चे संस्थापक सचिव पांडुरंग लाटे होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष बालाजी तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग धाराशिव जिल्हाध्यक्ष असद पठाण होते. यावेळी बालाजी तांबे म्हणाले की आ. सतीश चव्हाण यांची कार्यकर्त्यांची फळी भक्कम असून त्यांचा पदवीधरांशी संपर्क दांडगा आहे. त्यांच्याकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी, कामात वक्तशीरपणा असून राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांना पदवीधरांच्या प्रश्नांची जाणीव आहे.
अध्यक्षीय भाषणात पांडुरंग लाटे म्हणाले की आ. सतीश चव्हाण यांनी अनाथ मुलींना व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राहण्याची,जेवणाची व शिक्षणाची मोफत सोय केली.मुंबईच्या महत्त्वाच्या दवाखान्यात अनेक रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया केली.आ सतीश चव्हाण यांनी आजपर्यंत विधानभवनाच्या सभागृहात शिक्षण, विधी,कृषी,सहकार, वैद्यकीय,बेरोजगार व इतरांचे अनेक प्रश्न तळमळीने मांडून सोडवले आहेत म्हणून आ. सतीश भानुदासराव चव्हाण यांच्या नावापुढील चौकोनात इंग्रजीत 1 क्रमांक लिहून प्रथम पसंतीचे मत देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. शिक्षक संवाद मेळाव्याचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती अल्का जाधवर यांनी तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक अमर केवळराम यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार सहशिक्षक समीर सय्यद यांनी मानले.
