धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक (दि.01) येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक समतेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्यासोबत  विश्वास आप्पा शिंदे, धनंजय राऊत, प्रशांत पाटील, खलील सय्यद, मेहबूब पटेल, सरफराज काजी, अंकुश पेठे, हरिदास शिंदे, बाबा मोमीन, सय्यद मन्सूर, विष्णू पेठे यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या समतावादी विचारांचा प्रसार करून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


 
Top