धाराशिव (प्रतिनिधी)-  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी बोलताना राजाभाऊ राऊत यांनी सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला संघर्षाची प्रेरणा दिली. सामाजिक न्याय, समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या त्यांच्या विचारांचे जतन करून ते समाजापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या अभिवादन कार्यक्रमास सुनील वाघमारे, मारुती राऊत तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top