धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती “ लेखन प्रेरणा दिन “ म्हणून साजरी करण्यात आली. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.रमेश चौगुले व प्रमुख व्याख्याते,मार्गदर्शक डॉ. डि. एम. नेटके, माजी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. “लोकशाहीर अण्णाभाऊंचे साहित्य व तत्वज्ञान“ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. संचालक, प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षस्थान भुषविले. राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. डॉ. गोविंद कोकणे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. डि. एम. नेटके आपल्या व्याख्यानात म्हणाले की अण्णाभाऊंनी साहित्यातुन सत्य मांडले आहे. कथा, कादंबरीत कामगार व शेतकरी नायक आहेत.
त्यांंनी स्वयंप्रेरणेने साहित्य निर्माण केले. ते दारिद्य्रात वाढले, त्यांना मार्गदर्शक उपलब्ध नव्हते. त्यांच निरीक्षण वाखाणण्याजोगे आहे. 35 कादंबऱ्या लिहिल्या आहेत, 300 कथा लिहिल्या, 12 पोवाडे लिहिले, 15 नाटके लिहिले. 'मर्द मराठा, इन्किलाब, अशी नाटके लिहिली. त्यांच्या साहित्य कृती 27 भाषेत भाषांतरे झालेली आहेत. त्यांनी लोकांची भाषा मांडलेली आहे. त्यांच लिखान वास्तव वादावर आधारित आहे. दरिद्री परंतु स्वाभिमानी पात्रांचे चित्रण त्यांनी केले आहे. माणुसपणाचा धर्म जपला पाहिजे, असा संदेश त्यांनी साहित्यात दिलेला आहे. माणुस माणसाप्रमाणे जगले पाहिजे. 'माझी माय मरोबा' 'चित्रा' या साहित्य कृतीतून समतेचा संदेश दिलेला आहे. शिक्षणातून खरा भारत घडणार आहे. जातीयता निर्मुलन, समता, स्वाभिमान, इ
तत्व अण्णाभाऊ साठे यांनी तत्व मांडले आहे. माटंग मधील नायक आपल्या हक्कांसाठी लढा देतो. माणसाला जातीने नाहीतर क्रमाने मोजा असा संदेश अण्णाभाऊंनी दिला आहे. अण्णाभाऊंनी आत्मकथेत स्वतःचा संघर्ष मांडलेला आहे. श्रमाचा गौरव करा. साहित्य हे शोषितांचे शस्त्र आहे. आर्थिक न्यायाचे तत्व स्विकारा असे त्यांनी सांगितले आहे. “माझी माय मरौबा“ अशी साहित्य कृती निर्माण केल्या आहेत. स्त्री मुक्ती आणि समानतेचे तत्व त्यांनी मांडले आहे. बंधुता आणि राष्ट्रीय ऐक्याचे तत्व त्यांनी मांडले आहे. प्रतिकार, संघर्ष आणि क्रांतीचे तत्वज्ञान आहे. गिरणी कामगारांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. त्यांनी मांडलेली जीवनमूल्य चिरंतन महत्वाचे आहेत,असे त्यांनी म्हटले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंचे साहित्य वाचन करुन समकालीन जीवन समजुन घ्यावे. त्यांचे साहित्य प्रेरणादायी आहे. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी महत्वपूर्ण आहे,असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. गोविंद कोकणे, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. विक्रम शिंदे यांनी परिश्रम घेतले. डॉ. गोविंद कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ मेघश्याम पाटील यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
