परंडा (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने परंडा बस डेपोला नवीन 5 बसेस दाखल झाल्या. या नवीन बस गाड्यांचे पुजन भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व धाराशिव जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन बस गाड्यांमुळे परंडा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि व्यापारी वर्गाला मोठा लाभ होणार आहे. 

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, नगरसेवक रमेशसिंह परदेशी, माजी नगरसेवक शब्बीरमामु पठाण, भाजपा ता. उपाध्यक्ष डॉ.अमोल गोफणे, साहेबराव पाडुळे, प्रवाशी संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण शहा, परिवहन महामंडळ विभागीय वाहतूक अधिक्षक संतोष कोष्टी, परंडा आगार प्रमुख रामचंद्र शिंदे तसेच आगारातील चालक, वाहक, तांत्रिक विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top