धाराशिव (प्रतिनिधी)-  रूई (ढोकी) येथील किराणा दुकान फोडणारे तीन सराईत आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 6 लाख 59 हजार 15 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे मालाविषयी गुन्ह उघडकीस आणणे करिता रवाना होवुन पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त बातमी मिळाली की, कन्हेरवाडी पाटी येथील सुभाष भिमराव काळे यांने त्याचे साथीदारासह मागील दोन चार दिवसापुर्वी त्याचे मालकीचे इनोव्हा कारमध्ये तेलाचे डब्बे व इतर सामान कोठुन तरी चोरून आणले आहे. तेलाचे डब्बे व इतर सामान कन्हेरवाडी पाटी येथील त्याचे राहते पत्राचे शेडमध्ये ठेवले आहे. सुभाष काळे व त्याचे साथीदार हे येरमाळा येथे त्याची इनोव्हा कार घेवुन गेले आहेत अशी माहिती मिळाल्याने पथकाने येरमाळा येथे जावुन सापळा लावुन आरोपी सुभाष भिमराव काळे वय 34 वर्षे रा. कन्हेरवाडी पाटी, अनिल रमेश शिंदे वय 29 वर्षे रा. मस्सा, अरूण बबन शिंदे वय 28 वर्षे सर्व रा. मोहा यांना इनोव्हा कारसह ताब्यात घेतले. त्यांना गुन्हयाबाबत व गुन्हयामधील चोरी गेलेले मुददेमालाबाबत विचारपुस केली. त्यांनी सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यांना अधिक तपास केला असता त्यांनी गुन्हा केला असल्याचे कबुल केले. गुन्हयामधील चोरुन आणलेले तेलाचे डब्बे व इतर सामान कन्हेरवाडी पाटी येथील राहत असलेले पत्राचे शेडमध्ये ठेवले आहे असे सांगितले. 

पथकाने पत्राचे शेडमधुन किर्ती गोल्ड कंपनीचे व इतर कंपनीचे तेलाचे 13 डब्बे तसेच निळया व लाल रंगाच्या 08 पिशव्या, आतमध्ये घडी डिटर्जंट व घडी स्मार्ट निरमा पावडर असलेल्या पिशव्या व गुन्हा करतेवेळी वापरलेली इनोव्हा कार असा एकुण 6 लाख 59 हजार 615 मुददेमाल आरोपीचे ताब्यातुन जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कामगिरी  पोलीस अधिक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, सपोनि स्वप्नील वाळके, पोह विनोद जानराव, नितीन जाधवर, अमोल निंबाळकर, बबन जाधवर, मनोज जगताप, मपोह शोभा बांगर, चापोह महेबुब अरब, रोहीत दंडनाईक, यांचे पथकाने केली आहे.

 
Top