परंडा (प्रतिनिधी)- येथील जेष्ठ नागरिक मालती मधुकर कुलकर्णी (वय.80) यांचे सोमवारी दि. 27 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात मुलगा, तीन मुली, सुन, जावाइर्, नातवंडे असा परिवार आहे.
भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस, कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी यांचे आई तर कल्याणसागर समुहाच्या सचिव प्रज्ञा कुलकर्णी यांच्या सासू होत. त्यांचेवर मंगळवारी दि. 28 जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, नगराध्यक्ष जाकीर सौदागर, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांचेसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
