भूम (प्रतिनिधी)- भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला. धाराशिव येथे जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमानिमित्त आलेले राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री मंत्री जयकुमार गोरे यांचा भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब शिरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महादेवराव वडेकर, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, महादेव वाडेकर, शंकर खामकर, सिद्धार्थ जाधव, माजी जि प सदस्य ज्ञानेश्वर गीते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
