भुम (प्रतिनिधी)- कै.विलासराव रोकडे फाउंडेशन संचलित स्वस्थ मानस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र भूम या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचे पाद्यपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये हभप अरुण शाळू महाराज यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की, जन्म देणाऱ्या आई-वडिलांना प्रथम गुरुमाना त्यांची सेवा करा जीवनामध्ये मार्गदर्शक असणारा प्रत्येक व्यक्ती हा गुरु असतो. तसेच आदरणीय गुरुवर्य योग गुरु संजीवन सातपुते सरांनी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी शारीरिक, मानसिक स्वास्थ्य ,चांगल्या प्रकारे राहण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे योगा करणे महत्त्वाचे आहे. तसेच जीवनातल्या प्रत्येक गुरुचा आदर करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाप्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी राजश्री दीदी यांनी गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये असणारे नाते आपण आपल्या मानसिकतेवरती विचार करण्याच्या क्षमतेवरती कसे अवलंबून असते त्याचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वस्थ मानस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे समुपदेशक विनोद वाघमारे यांनी केले. आजपर्यंत केंद्राच्या माध्यमातून हजारो लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे उद्ध्वस्त होणारे कुटुंब परत बसवण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असे विचार संस्थेचे संचालक नवनाथ रोकडे यांनी व्यक्त केले. भूम नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल आण्णा बागडे यांनी व्यसनमुक्त होण्यासाठी उपचारासाठी असलेल्या परिवर्तनवादी मित्रांना आई-वडिलांचे सेवा करणे जीवनामधल्या चांगल्या वाईट गोष्टी त्या ठिकाणी असणारे मार्गदर्शक हे प्रत्येक जण आपल्या गुरुस्थानी त्यांचा आदर करणे हे आपले परम कर्तव्य आहे असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी योगेश आसलकर, श्याम बागडे, शुभम फलके, गुरु सुरवसे, शुभम अवसारे, गणेश विभुते, गोपाळ येळमकर यांनी सहकार्य केले.
