तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील बुकनवाडी येथील शिवप्रताप सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने बुकनवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील 80 विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना वह्या, पुस्तक,पेन, पाण्याची बाटली वाटप करण्यात आली.
यावेळी शिवप्रताप सामाजिक बहुउद्देशीय संस्थचे अध्यक्ष शिवाजी भोसले, सचिव सुधाकर बुकन, उपाध्यक्ष सुदर्शन बुकन, इंद्रजित बुकन, मुख्याध्यापक प्रकाश खडके,शांता सलगर आदी उपस्थित होते.
