जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा; १२ जण ताब्यात, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
धाराशिव: पोलीस प्रशासनाने लातूर-ढोकी रोडवरील अळणी येथील एका बियर बारच्या आडोशाने चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत तब्बल २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर-ढोकी रोडवर असलेल्या ‘दर्शन बियर बार आणि परमिट रूम’च्या आडोशाने बेकायदेशीररित्या ‘तीन पत्ती’ (तिरट) क्लब चालवला जात होता. या ठिकाणी पैशांच्या बदल्यात कॉईन्स देऊन त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जुगार खेळवला जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती परि. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळाली होती.
माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत योजना बद्ध छापा मारला
या धडक कारवाईत परि. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे तसेच क्यू.आर.टी. (QRT) व आर.सी.पी. (RCP) अंमलदार आणि चालकांच्या पथकाने थेट सहभाग घेतला.
पोलिसांनी या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून एकूण १२ संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच बार मालक श्रीपाद नारायण वीर याच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुगाराचे साहित्य (पत्ते आणि कॉईन्स)मोबाईल फोन२ चारचाकी वाहने ४ दुचाकी वाहने एकूण किंमत: रु.२१,९०,३०५/- (एकवीस लाख नव्वद हजार तीनशे पाच रुपये मात्र) जप्त करण्यात आले आहे