भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते आज आयोजित “भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या“ लोगो व प्रसिद्धी पत्रकाचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले. या भव्य स्पर्धेमुळे राज्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या नृत्य स्पर्धेचे स्वरूप अत्यंत व्यापक असून यामध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील नामवंत स्पर्धक आपला कलाविष्कार सादर करण्यासाठी सहभागी होणार आहेत. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आयोजकांच्या वतीने अत्यंत आकर्षक आणि मोठ्या स्वरूपाची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुप्त गुणांना वाव देण्याचा संकल्प आयोजकांनी यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमांमध्ये विशेष करून ईटच्या मातीमधून उच्च पदावर कार्यरत असलेले 125 मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये वैद्यकीय सेवा, लष्करी व निमलष्करी सेवा, विधी व न्याय, राजपत्रित अधिकारी, उच्च विद्या विभूषित, तसेच परिसरातील सर्व पत्रकार यांना “ईट रत्न“ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
बाल गट समूह नृत्य- प्रथम 31000, द्वितीय 21000, तृतीय 11000, उत्तेजनार्थ 7000, प्रौढ गट समूह नृत्य स्पर्धा- प्रथम 51000, द्वितीय 31000, तृतीय 21000, उत्तेजनार्थ 11000, बाल गट वैयक्तिक नृत्य स्पर्धा- प्रथम 21000, द्वितीय 11000, तृतीय 7000, उत्तेजनार्थ 5000, प्रौढ गट वैयक्तिक नृत्य स्पर्धा- प्रथम 25000, द्वितीय 21000, तृतीय 11000, उत्तेजनार्थ 7000 वरील प्रमाणे स्पर्धकांना बक्षीस हे मिळणार आहेत. ही स्पर्धा 11 एप्रिल 2026 व 12 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेचे ठिकाण पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईट येथे भरणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख, विशाल ढगे, सुनील भोईटे, युवराज हुंबे यांसह आयोजक प्रवीण देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.