भूम (प्रतिनिधी)-  भूम शहरातील गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिरामध्ये पहाटे अभिषेक पूजा ,ग्रंथराज पारायण करण्यात आले. नेकनूर येथील लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे काल्याचे किर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावेळी कीर्तन सेवा देताना महाराजांनी सांगितले की, गजानन महाराजांनी सांगून दिलेली देवाची भक्ती अशाप्रकारे करायची त्यामुळे आपल्या जीवनाचे कल्याण होते . यावेळी मेगडे महाराजांनी गजानन महाराजांच्या काळातील सर्व अशी सखोल माहिती आपल्या कीर्तन सेवेतून भाविक भक्तांना सांगितली. त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दिनांक 6 ते 8 या कालावधीमध्ये मंदिरात भजन व जागर आयोजित करण्यात आले होते. मुक्ताई महिला भजनी मंडळ, सद्गुरु सोमनाथ भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळाच्या वतीने भजन व हरिजागर दोन दिवसाच्या कालावधीमध्ये करण्यात आला. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाढवे, सचिव दिपक खराडे, अरविंद शिंदे, अतुल डिसले, अनिल जाधवर, प्रदीप मोरे, राम मुंडेकर, दत्ता गाढवे, आबा घुले, अनिल तोडकर, दीपक मैदर्गे, विकास माळवदे, अभय मनगिरे, अमोल तुळशी यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top