धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीमध्ये अर्चना पाटील यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून कमी मते पडली. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने भूम, परंडा, वाशी मतदारसंघात शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्या विरोधातील उमेदवारांना रसद पुरविली. असे असताना परत नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना व त्यांच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील करत आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना शिवसेना नेत्यांचे फोटो वापरण्यास सक्त मनाई केली होती. त्यामुळे आमचा घराणेशाहीला विरोध आहे. आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचा अध्यक्ष होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आल्याची माहिती शिंदे शिवसनेचे जि. प. चे माजी सभापती दत्ता साळुंखे व युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अविनाश खापे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेस महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख भारती गायकवाड, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख निखील घोडके, मनोज मोटे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना दत्ता साळुंखे यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या नावावर काढलेल्या पत्रकारात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यासह शिवसेनेला बदनाम करण्याचे कटकारस्थान चालू आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीत विरोधात वातावरण असल्यामुळे अर्चना पाटील यांना कमी मतदान मिळाले. भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तुळजापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अर्चना पाटील यांना मोठ्या प्रमाणात अल्य मते मिळाली. यांचा अर्थ त्यांनी पण विरोधात प्रचार केलेला का असा होतो. असे असताना केवळ भूम, परंडा, वाशी मधून कमी मतदान मिळाले म्हणून टार्गेट करणे आम्हाला बरोबर नाही.
घराणेशाहीला विरोध
यावेळी पत्रकारांशी बोलताना अविनाश खापे यांनी आमचा भाजला विरोध नाही. घराणेशाहीला विरोध आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे नेहमीच खच्चीकरण करत आहेत. आमच्यातील काही गद्दार लोक भाजप सोबत असल्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडील महिलाही इच्छुक आहेत. आमचे 28 जि. प. सदस्य संख्याबळ असून, शिवसेनेचा अध्यक्ष होईल असे सांगितले.
