धाराशिव (प्रतिनिधी)- बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या बोधिसत्व, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी प्रवीण सूर्यवंशी तर कार्याध्यक्षपदी सुधीर रामेश्वर पवार यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या कार्यालयात समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.15) झालेल्या बैठकीत सर्वानुमते ही निवड जाहीर करण्यात आली. यावर्षीची मिरवणूक 27 एप्रिल रोजी काढण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
समितीच्या वतीने धाराशिव येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने जयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा मागील 31 वर्षांपासून कायम आहे. यामध्ये सर्व जाती-धर्मातील व्यक्तींचा समावेश असून दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने विशेषतः पारंपारिक वाद्यांच्या गजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येते समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर, रुग्णांना फळे वाटप, वृक्ष लागवड, दिव्यांगांना मोफत सायकल यासह विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी देखील विविध राज्यातील पारंपारिक वाद्य समूहांना आमंत्रित करण्यात आल्यामुळे ही मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी बैठकीत घोषीत केले. यावेळी राजाभाऊ बागल, आबा खोत, मुकुंद घुले, सतीश कदम, लक्ष्मण माने, रवी कोरे, पांडुरंग भोसले, सुभाष पवार, नंदकुमार शेटे, इलियास मुजावर, रावसाहेब शिंगाडे, विशाल शिंगाडे, सुरेश गवळी, रिजवान शेख, राजाभाऊ कळसकर यांचेसह सर्वधर्मीय समाज बांधव उपस्थित होते.

