धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी काळात दिनांक 19 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 31 मार्च 2026 या कालवधीत साजरे होणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रमजान ईद, गुढीपाडवा, श्रीरामनवमी, महावीर जयंती, हे सण-उत्सव आणि कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात जातीय सलोखा, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी या दृष्टीने दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी, कार्यालय मिटींग हॉल धाराशिव येथे किर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी धाराशिव यांचे अध्यक्षतेत जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पार पडली.
सदर बैठकीस पोलीस अधीक्षक रितु खोखर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर आणि जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी व शांतता समितीचे स्थायी व अस्थायी सदस्य, मंडळाचे पदाधिकारी, शांतता प्रेमी सुजान नागरीक उपस्थित होते.सदर बैठकीत सदस्यांनी आगामी सण, उत्सव प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत माहिती देण्यात आली. त्या बाबत सदस्यांनी केलेल्या सुचना व त्यावर करण्यात येणारी कार्यवाही बाबत चर्चा करुन समस्यांचे निराकरण करणे बाबत जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधीत विभागांना सुचना दिल्या. प्रशासनाकडुन नागरीकांना आगामी साजरे होणारे सण उत्सव जिल्ह्यात जातीय सलोखा अबाधीत राखुन, शांततेत व उत्साहत साजरे करणे बाबत आवाहन करुन सर्वांना सण, उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.