भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील माणकेश्वर येथील महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्ताने दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांनी अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा व बेलपत्र अर्पण करून भगवान शंकराचे दर्शन घेतले. अनेकांनी उपवास, जागरण व विशेष पूजा करून महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला. रात्री 11000 दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी वापरलेल्या शस्त्रांची माहिती मिळवताना तरुणाई विशेष उत्सुकतेने पाहत होती. इतिहास अभ्यासक व शालेय विद्यार्थ्यांनी नोंदी घेत या प्रदर्शनाचा अभ्यास केला. या चार दिवसांच्या महोत्सवात गावात भक्ती, इतिहास व संस्कृती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या यशस्वी आयोजनासाठी श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

