परंडा (प्रतिनिधी)- विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या माध्यमातून जिजाऊ ब्रिगेड च्या संकल्पनेतून महिलांसाठी विशेष कार्यक्रम वैचारीक मनोरंजनातुन जिंका पैठणी या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी दि.१८रोजी करण्यात आले आहे.तसेच दिपोत्सव व गुरुवारी दि.१९ रोजी भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.सायंकाळी दिपोत्सव कार्यक्रमानंतर सहभागी स्पर्धकांची बौद्धीक चाचणी घेऊन यामधून १५ स्पर्थकांची निवड केली जाणार आहे . राजमाता जिजाऊ माँसाहेब , छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसुबाई व महाराणी ताराबाई यांच्या जीवन कार्यावर या स्पर्धेत प्रश्न विचारले जाणार आहेत . प्रथम बक्षिस ५ नग मिक्सर व पर्स ,द्वितीय बक्षिस ५ नग कुकर व तृतीय बक्षिस ५ नग स्टीलचा टब असे बक्षीस ठेवण्यात आले आहे . या स्पर्धेत महिलांनी मोठयासंख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने करण्यात आले आहे .
