धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्य,कर्तृत्व व राष्ट्रनिर्मितीच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 19 फेब्रुवारी 2026 रोजी मेगा पदयात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त,छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येत असून धाराशिव येथेही सकाळी 7.30 वाजता मेगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, सर्व शैक्षणिक संस्था, एनएसएस, एनसीसी, ‌‘माय भारत‌’ तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे.

धाराशिव येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथून सकाळी 7.00 वाजता पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले चौक, सुनील प्लाझा मार्गे नगरपरिषद रोड, जिल्हा परिषद, शासकीय विश्रामगृह, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून डावीकडे वळून कोहिनूर हॉटेलसमोर, जुने दूरदर्शन केंद्र, समता नगर, श्री चित्रमंदिर गोरें कॉम्प्लेक्स, महात्मा ज्योतिबा फुले चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

 
Top