धाराशिव (प्रतिनिधी)-सांस्कृतिक कार्य मंत्त्री. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व   सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली भारूड महोत्सवाचे  धाराशिव येथील  स्वयंवर मंगलकार्यालय येथे आयोजन  करण्यात आलेले आहे.

दिनांक १५, १६ आणि १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

महत्त्वाची माहिती:

 * कालावधी: १५ ते १७ फेब्रुवारी २०२६

 * वेळ: दररोज सायंकाळी ६:३० वाजता

 * स्थळ: स्वयंबर मंगल कार्यालय, बार्शी नाका, धाराशिव.

महोत्सवाची वैशिष्ट्ये:

या तीन दिवसीय भारुड महोत्सवात अध्यात्मिक आणि सामाजिक विषयांवर आधारित भारुडांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये सजन पाटील खंडाळी व सहकारी, भगवान पवार व सहकारी, बालाजी शिरसट व सहकारी, जननीदेवी भजनी मंडळ (गोळेवाडी, भोर) आणि सिंहगड पब्लिक स्कूल (कोर्टी, पंढरपूर) यांचे संघ सादरीकरण करतील.

महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून कृष्णाई उळेकर (धाराशिव) यांचा 'रंग भारुडाचे वारी लोककलेची' हा विशेष भारुड कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

प्रवेश विनामूल्य:

हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. रसिक प्रेक्षकांनी आणि कलाप्रेमींनी या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.


 
Top