धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर येथील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने अंमली पदार्थ लागवड करणाऱ्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे येवून धाकटेवाडी येथील शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजी नगर कृती विभाग यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौ. धाकटेवाडी ता. उमरगा जि. धाराशीव येथील शेतजमीनीत मानवी मेदुंवर विपरित परिणाम घडवुन आणणाऱ्या गांजाच्या झाडाची (कॅन्बीस प्लांटची) अवैधरित्या लागवड करण्यात आली आहे. त्यावरून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजी नगर कृती विभाग यांनी मौ. धाकटेवाडी ता. उमरगा जि. धाराशीव येथे शेत गट न.38/163/ 2 मध्ये छापा मारला. यावेळी शेतजमीनीवर गांजा वनस्पती (कॅन्बीस प्लॅन्टंची) ची अवैधरित्या लागवड करून देखभाल व रखवाली करताना मिळून आली आहे. सदर ठिकाणी कायदेशीर पंचनामा करून गांजाची एकूण लहान-मोठे झाडे उपटून गठठे बांधून वजन करता 146 किलो गांजाची झाडे किमंत 73 लाख 13 हजार 500 रूपयाचे माल मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे.
सदर प्रकरणात पोलीस ठाणे उमरगा जि. धाराशीव येथे अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स संभाजी नगर कृती विभागाचे स.पो.नि दिपाली पाटील यांचे फिर्याद वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ही अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस अधिक्षक अजीत टिके, खाटमोडे, यांचे मार्गदर्शनाखाली डि.वाय.एस.पी साईनाथ ठोबंरे, पोलीस निरीक्षक गीता बागवडे, स.पो.नि. दिपाली पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, हवालदार शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, कैलास गाडंकर, नितीन जाधव, रविंद्र साळवे, सुरज जोनवाल, ज्ञानेश्वरं चव्हाण, हरीशचंद्र मुंढे, अमितसिंग ठाकूर, अतुल तुपे, अम्रपाली सुर्यवंशी, ज्योती किर्तीकर, प्रियंका पवार यांनी केली आहे.
