धाराशिव (प्रतिनिधी)- भाकरीची भूक ही सर्वात अस्वस्थ करणारी असते. त्यामधून तरुणांमधील अस्वस्थता वाढून क्रांती ही होऊ शकते. लोकसंख्या वाढ, वाढते प्रदूषण, वाढते दारिद्य्र, वाढता सार्वजनिक खर्च, लाच लुचपत दिरंगाई ,भ्रष्टाचार, या गोष्टी भारताच्या आर्थिक प्रगतीतील अडथळे आहेत. असे प्रतिपादन कुर्डूवाडी येथील ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. प्रमोद शहा यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख हे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना. देशाला विकसित करावयाचे असेल तर स्वतः विद्यार्थ्यांनी आपले अर्थशास्त्र जाणून घेतले पाहिजे असे ते म्हणाले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी केले. तर आभार अर्थशास्त्राचे प्रा. डॉ. दयानंद हाके यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी निकिता माने हिने केले.
सदर कार्यक्रमासाठी के.एन.भिसे महाविद्यालयाचे प्रा.डॉ. दत्तात्रेय कदम, शिवाजी महाविद्यालय कळब येथील प्रा. अभिमान ढाणे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ.मंगेश भोसले, प्रा.डॉ.बालाजी गुंड, प्रा.विवेकानंद चव्हाण, प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर, व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
