कळंब (प्रतिनिधी)-  उपोषणाच्या बाराव्या दिवशी बाळराजे आवारे पाटील यांची प्रकृती खालावली असून राज्य निवडणूक आयोगाकडून अद्यापही त्यांच्या उपोषणाची दखल न घेतली गेल्याने लोकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील हे मौजे तांदूळवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे दिनांक 16 जानेवारी पासून ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव चा नारा घेऊन आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणाचा आज बारावा दिवस आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या उपोषणाच्या संदर्भाने अजूनही गांभीर्याने पाहिलेले नाही. बाळराजे आवारे पाटील यांची प्रकृती खालावत चालली असून निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे लोकातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या या उपोषणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास नजीकच्या काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा प्रतिष्ठानचे मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव, मराठवाडा सचिव साई पाटील, परभणीचे जिल्हाध्यक्ष विशाल कुठे, धाराशिव चे जिल्हाध्यक्ष एडवोकेट प्रणित डिकले, महिला प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे पाटील तसेच हिमानी मोहोळ, तांदुळवाडीचे उपसरपंच महावीर डिकले, पुष्पक देशमुख, अमोल रायगावकर, राम किर्दक, संभाजी आघाव आदींनी दिला आहे.


 
Top