परंडा (प्रतिनिधी)- परंडा गटशिक्षण कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला काळा बाजार आणि नियमबाह्य कारभार अखेर उघडकीस आला आसुन विस्तार आधिकारी,सद्या परंडा येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेले एस.बी.हाके यांनी सेवा प्रवेशोत्तर परीक्षा न देता शासनाची दिशाभूल करून वेतन वाढीचा आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
हा प्रकार उघडकीस आणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राहुल बनसोडे यांनी जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली.
