तुळजापूर (प्रतिनिधी)- आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण, मुंबई तसेच गटनेते महाराष्ट्र विधान परिषद यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले.
आमदार दरेकर यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली तसेच प्रस्तावित विकास आराखड्याचा सविस्तर आढावाही घेतला. ेमंदिर परिसरातील विविध विकास योजनांबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी मंदिर संस्थान तर्फे तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने यांनी आमदार प्रवीण दरेकर यांचा सत्कार केला. या प्रसंगी मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी तसेच पुजारी बांधव उपस्थित होते.
