तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील मौजे केशेगाव येथील  सिध्दाराम पंडित दहिटणे (वय 35 वर्ष, रा.केशेगाव ता.तुळजापुर) या युवकाचा आरोपी निखिल सोमनाथ कांबळे (वय 25 वर्ष, रा.केशेगाव ता.तुळजापुर) यांनी कुऱ्हाडीने घाव घालून भर दिवसा खून केला. ही घटना शनिवार दि.1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी नऊच्या वाजण्याच्या सुमारास केशेगाव येथील भर चावडी चौकात घडली. 

घटनेची माहिती अशी की, मयत सिध्दाराम पंडित दहीटणे (वय 35 वर्ष) हा युवक सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास केशेगाव येथील चावडी चौकातील हॉटेलच्या बाजूस खुर्चीवर मोबाईल पाहत बसलेला होता. त्या वेळेस केशेगाव येथील पंचवीस वर्षीय युवक आरोपी निखिल सोमनाथ कांबळे हा मोटार सायकलवर चावडी चौकात आला. हातात कुऱ्हाड घेऊन तो मोबाईल पाहत बसलेल्या मयत सिध्दाराम पंडित दहीटणे यांच्या पाठीमागे गेला आणि हातातील कुऱ्हाडीने सिध्दाराम याच्या मानेवर सपासप वार केले. कुऱ्हाडीने जबर घाव केल्याने सिध्दाराम दहीटणे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. गंभीर घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी निखिल कांबळे हा सिध्दाराम याचा खून करून परत तो मोटार सायकलवरून निघून गेला. घटनेची माहिती कळताच नळदुर्ग पोलीस स्टेशन व इटकळ औट पोस्टचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पळून जाणाऱ्या आरोपीस पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. या भर दिवसा घडलेल्या खुनामुळे केशेगाव व परिसरात घबराट पसरली आहे. मागील भांडणाच्या वादातून कुरापत काढत हा हल्ला करण्यात आला असल्याचे प्राथमिक स्वरूपात सांगितले जात आहे. या खुनी हल्ल्याचा सर्व प्रकार सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात ही कैद झाला असून दृश्यं अतिशय थरारक, भयानक असे आहेत.

 
Top