कळंब (प्रतिनिधी)- येथील पोलीस ठाणे यांच्या वतीने दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते 8 या दरम्यान कळंब शहरातून विद्याभवन हायस्कूल ते छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिजामाता चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अहील्याबाई होळकर चौक ते पोलीस ठाणे कळंब असा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. सदर दौड मध्ये उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, पोलीस निरीक्षक  अजित चिंतले, सपोनि प्रभा पुंडगे, सपोनि हनुमंत कांबळे, सपोनि पंढरीनाथ मगर सह 40 पुरुष अंमलदार, 10 महीला अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. या दौडची सांगता कळंब पोलीस ठाण्यात राष्ट्रगीताने करण्यात आली.


 
Top