भूम (प्रतिनिधी)- भूम नगरपालिकेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. निवडणुकीचे वातावरण तापले असून भूम शहरातील दोन्ही राजकीय गट आघाडी करूनच निवडणुकीला सामोरे जाणार असल्यास ही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.

आगामी येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीसाठी गाढवे गट व थोरात गट हे पारंपारिक विरोधकच एकमेकांसमोर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. दोन्ही गटाकडून 20 जागेवरील नगरसेवक पदासाठी चांगल्या उच्चशिक्षित व स्वच्छ चेहऱ्याच्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. मात्र दोन्ही गटासोबत असणाऱ्या मागील 20 ते 25 वर्षापासून आम्हीच आमच्या गटाचे अशा एकनिष्ठ व केव्हाही हातातील काम सोडून बैठकीसाठी व कामासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांला उमेदवारी मिळते का निवडणुकीपुरते आम्हीच तुमचे कार्यकर्ते असे म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळते. पुढे येणाऱ्या काही दिवसात दिसणार आहे.

गाढवे व थोरात गटाकडे मागील काही काळापासून एक निष्ठेने काम करणारे सर्व समाजातील कार्यकर्ते आहेत .भूम शहरात 10 प्रभाग आहेत .त्यामध्ये 20 नगरसेवक असणार आहे. गाढवे गट मागील काळात केलेल्या विकास कामे व पुढील काळात करणाऱ्या विकासकामावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे गाढवे गटाचे प्रमुख माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी संवाद बैठक घेऊन कार्यकर्त्या सोबत चर्चा करत सांगितले.

सर्वपक्षीय असणाऱ्या थोरात गटामध्ये सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणुक लढवणार असल्याचे बोलले जात आहे .त्यामध्ये सर्वच्या सर्व 20 जागेवर कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या या ठरल्या असून नगराध्यक्ष पदासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने धनाजीराव थोरात यांच्या पत्नी यांचे नाव समोर येत आहे. आघाडी करून एकच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये पारंपारिक लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. नगराध्यक्ष पदासाठी ही गाढवे विरुद्ध थोरात अशीच लढत होताना सध्यातरी चर्चेमधून दिसत आहे.


 
Top