मुरुम (प्रतिनिधी)- भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल  शिवाजीराव मोरे  यांना आदर्श शिक्षण संस्था चालक पुरस्कार आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव यांच्या वतीने  देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण धाराशिव  तेथे श्री सुधीर पाटील आणि  मान्यवरांच्या हस्ते मोरे यांच्या वतीने  प्राचार्य डॉ संजय अस्वले आणि डॉ  देवरकर यानी  स्विकारले.

या पुरस्काराचे सन्मानपत्र अध्यक्ष श्री अमोल मोरे यांना देउन अभिनंदन करताना प्राचार्य डॉ संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ  पी ए  पीटले, पर्यवेक्षक एस ए महामुनी,  डॉ  पी एस  माने,  डॉ एन एम मोरे,  डॉ व्ही एस सूर्यवंशी, डॉक्टर ए एस पदमपल्ले, डॉक्टर ए एस आष्टे, डॉक्टर डी बी  ढोबळे, डॉक्टर बी ए शेळके, डॉक्टर सी डी करे.

श्री मोरे यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात उमरगा परिसरात फार्मसी महाविद्यालयाची सोय उपलब्ध केली. तसेच नॅक तिसऱ्या सायकलमध्ये महाविद्यालयाला अ दर्जा दर्जा मिळवून दिला.  तसेच महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा अत्याधुनिक करताना संगणक प्रयोगशाळा, रेफ्रिजरेटर आणि एसी लॅब, तसेच करिअर कट्टा स्वतंत्र स्पर्धा परीक्षा डिजिटल क्लासरूम, हरित परिसर तसेच विविध शाखांच्या गुणवत्ते वाढीवर भर दिला. जिल्ह्यातील पहिले नेमबाजी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. संस्थेचे संस्थापक तात्यारावजी मोरे आबा, त्यानंतर श्रीधररावजी मोरे अण्णा , आणि शिवाजीराव दाजी मोरे यांनी घालून दिलेला शिक्षणातून सामाजिक बांधिलकीचा वसा जपताना आधुनिकीकरणावर भर दिला.   म्हणूनच आदर्श संस्थाचालक हा सन्मान त्यांना मिळाला आहे.

 या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष मोरे, सरचिटणीस जनार्दन साठे, सचिव पद्माकर राव हराळकर, सहसचिव डॉक्टर सुभाष वाघमोडे,  सर्व संचालक मंडळ,  सदस्य त्याचबरोबर संस्थेचे कर्मचारी वृंद यांनीही अभिनंदन केले आहे.

 
Top