धाराशिव (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेवर विविध पदावर काम केलेले जेष्ठ पत्रकार दिलीप गणपतराव पाठक नारीकर (वय 69) यांचे शुक्रवारी पहाटे ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी 1 वाजता कपिलधार स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, जावाई, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. दिलीप पाठक नारीकर यांनी दैनिक झुंजार नेता मधून पत्रकारितेची सुरूवात केली होती. त्यानंतर दैनिक सकाळमध्ये 30 वर्षापेक्षा जास्त काळ वरिष्ठ बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात अनेक विकासात्मक कामे मार्गी लावण्याचे काम केले. राजकीय, सामाजिक, भ्रष्ट आदी विषयावर त्यांनी खंबीरपणे बातमीदारी केली. निवृत्तीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याच्या राजर्षी शाहू महाराज संस्थेचे ते काम पाहत असत. दिलीप पाठक नारीकर यांच्या अंत्यविधीवेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आंबेडकर कारखान्याचे चेअरमन अरविंद गोरे, भाजपाचे जेष्ठ नेते मिलिंद पाटील, शिंदे शिवसेनेचे अनिल खोचरे, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, माजी कामगार नेते चंद्रकात मुळे, पृथ्वीराज चिलंवत, उमाजी देशमुख, रामेश्वर बध्दर आदींनी श्रध्दांजलीपर भाषणे केली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 
Top