तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे होणाऱ्या श्रीतुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2025 (शके 1947) निमित्ताने भाविकांसाठी उपलब्ध असलेल्या दर्शन पासांच्या शुल्कात वाढ  करण्यात आले आहेत. तसेच सकाळची अभिषेक संख्या शंभरने वाढवली आहे.

 नवरात्र काळात लागू होणारे नवे दर याप्रमाणे आहेत. देणगी दर्शन पास सध्याचे शुल्क 200 रूपये, नवरात्र काळ शुल्क 300 रूपये आहेत. तर देणगी दर्शन पास (स्पेशल) सध्याचे  शुल्क  500, नवरात्रकाळ शुल्क 1 हजार रूपये आहे. स्पेशल गेस्ट देणगी दर्शन पास (फॅमिली पास) सध्याचे शुल्क 200 असून, नवरात्र काळात शुल्क 500 रूपये आकारण्यात येणार आहे.  सकाळचे अभिषेक अधिकृत पास संख्या 300 वरून वाढवून 400 करण्यात आली आहे. तर दर्शन पास वितरणाची सुरुवात 15 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 5.00 वाजल्यापासून होणार आहे. तर पास बंद होण्याची वेळ 21 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 5.00 वाजेपर्यत आहे. या संदर्भातील निर्णयाची घोषणा तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी केली आहे.

 
Top