धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, धाराशिव येथे फार्मसी विभागामध्ये आज  पाचव्या राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स आठवड्या निमित्त “औषधांचे दुष्परिणाम नोंदणी  प्रक्रिया“ या विषयवर प्रशिक्षण देण्यात आले.

 कॉलेजचे प्राचार्य, डॉ. विक्रमसिंह माने यांच्या  मार्गदर्शनाखाली या सेशनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी  विठ्ठल तिखांडे व  नितीन राठोड, क्लस्टर ऑफिसस, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट यांना निमंत्रित करण्यात आले होते.  त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातून प्लेसमेंट झालेल्या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील गौरविण्यात आले.  यावेळी कु. उत्कर्षा नेवाळे, महाविद्यालयीन विद्यार्थीनी हिने  औषधीय दुष्परिणाम नोंदणी ऑफिसर,  टीसीएस, मुंबई येथील काम करतानाचा अनुभव सांगितला. तसेच ही नोंदणी प्रक्रिया रुग्णांच्या सुरक्षेसाठी कशी महत्त्वाची आहे हे समजावून सांगितले. महाविद्यालयातर्फे ल्यूपिन रिसर्च पार्क, पुणे येथे नोकरी मिळालेल्या कु. स्नेहदीप माळी यांनीदेखील विद्यार्थ्यांना औषधांची क्वालिटी वाढवण्यासाठी  कंपनी कशा पद्धतीने काम करतात हे सांगितले. कु. वडजे हिने देखील विद्यार्थ्यांना नौकरी संदर्भात मुलाखत कशी द्यावी  याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या या यशस्वी विद्यार्थ्यांनी  प्राचार्य आणि शिक्षकांनी केलेले सहकार्य व वेळोवेळी दिलेले  प्रशिक्षणामुळेच आम्ही नामांकित कंपनीमध्ये सर्वोच्च पॅकेजवर रुजू झालो असा फीडबॅक देऊन महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले  या विद्यार्थ्यांबरोबरच 

आणखी नजदीकच्या काळात काळामध्ये 50 हून अधिक  विद्यार्थ्यांचाही महाविद्यालयातर्फे प्लेसमेंट करण्यात आले आहे. यामधे टी.सी.एस, मुंबई,विंमटा हैदराबाद,  ऍडव्हान्टमेड पुणे, गिब्स, छत्रपती संभाजीनगर व आय के सोल्युशन मुंबई यासारख्या नामांकित आयटी कंपन्यांचा समावेश आहे.

यासाठी फार्मसी विभागाचे  ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. जी.बी. चिवटे  आणि प्रा. ए.एम. जगताप हे विशेष प्रयत्न घेतात. कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. माने सरांनी औषध निर्मिती या क्षेत्रातील वाढत्या रोजगाराचा आढावा घेतला आणि त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे नियोजन फार्मसी विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती टी. माने, व प्रा. सायली एस. पवार यांनी केले. तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मदत केली.

 
Top