भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये  BIREAU VERITAS  या कंपनीच्या माध्यमातून व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने 32 मुलांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य असलेली स्कुल बँग व 48 मुलांना शैक्षणिक साहित्य असलेली पिशवी मोफत देण्यात आली. या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भूम पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अख्तर जावेद हे होते. 

यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना  स्कूल किट  व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मनोगत ते म्हणाले की,“ मी ही जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. माझ्या घरची परिस्थिती हालाखीची होती परंतु मी परिस्थितीवर मात करून आज अधिकारी पदापर्यंत पोहचलो आहे. आमच्या काळात आम्हाला अशा पद्धतीच्या मदती मिळत नव्हत्या साधी पिशवी म्हणजे आमचे दप्तर असायचे आज तुम्हाला असे शैक्षणिक साहित्य मिळत आहे. त्याचा उपयोग करून खूप अभ्यास करावा व आपले स्वप्न पूर्ण करावे. परिस्थिती कधीही यशाला आडवी येत नसते फक्त आपण मात्र परिस्थितीवर मात केली पाहिजे असे सांगितले. “ कार्यक्रमाला शिक्षण विस्ताराधिकारी साळुंखे, सेवा फाउंडेशनचे प्रतिनिधी विनायक शिंदे, प्राध्यापक गरड उपस्थित होते.

स्कूल किट प्राप्त करण्यासाठी शाळेतील दत्ता गुंजाळयांनी प्रयत्न केले. साहित्य प्राप्त करून देण्यासाठी सेवा सहयोग फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे सर तालुका समन्वयक संतोष तोडकरी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला उपस्थित होते. पालक प्रतिनिधी या नात्याने समाधान राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करून मुलांनी पालकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिस्तीचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक तात्या कांबळे, पवार के. सी., पाटील डी. जी., पायघन यु. पी., जोशी ए. टी., राजेंद्र गाडे, गुंजाळ डी. एस., मुकटे, साठे एच. डी., झरकर अनंता व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

 
Top