तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तुळजापूरकरांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तुळजापूर येथील मुख्य नवीन बसस्थानकाला ‌‘श्री तुळजाभवानी बसस्थानक' तर जुन्या बसस्थानकाला ‌‘छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक' असे नाव देण्यात आले आहे.

दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, राज्यभरातील विभाग नियंत्रक व आगार प्रमुखांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (नियोजन व पथन) यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, “यापुढे तुळजापूर येथील मुख्य बसस्थानक ‌‘श्री तुळजाभवानी बसस्थानक' व जुन्या बसस्थानकाला ‌‘छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक' या नावाने ओळखले जाईल. सर्वांनी या नामनिर्देशनाचा उल्लेख करावा.”


 
Top