वाशी (प्रतिनिधी)- महाराष्ट लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात आलेल्या ,महाराष्ट्र गट ब संयुक्त परिक्षा 2024 या परिक्षाचा निकाल 16 सप्टेंबर 2025 रोजी जाहिर झाला. यामध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळै महाविद्यालयातील प्रा.आर.आर.जाधव व सावित्री राम जाधव यांची कन्या ऋतुजा राम जाधव हिने महाराष्ट्र राज्यातून खुलागट मुली मध्ये चौथा क्रमांक मिळवला आहे.
ती सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई. व राज्यकर निरिक्षक वर्ग 2 या पदासाठी निवड झालेली आहे. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिचा यशामध्ये तिची आई वडील,भाऊ,मित्र,मैत्रीणी, नातेवाईक,कर्मवीर परिवार यांचा मोलाचा वाटा आहे.