धाराशिव (प्रतिनिधी)- टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर यांच्या पुढाकारातून व ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा हिंगळजवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतीराज अभियान” अंतर्गत लोकसहभाग व स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून टिसचे ग्रामीण विकास तज्ञ श्री. गणेश चादरे यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतीराज अभियान यशस्वी करणे ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक ग्रामस्थाची सामूहिक जबाबदारी आहे. लोकसहभागाशिवाय गावांचा विकास शक्य नाही.”

त्यांनी ग्रामस्वच्छता, पाणी व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, ग्रामसभेतील सहभाग, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संवर्धन अशा विविध पैलूंवर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच “सुशासनयुक्त पंचायत, हरित-स्वच्छ व आत्मनिर्भर गाव हेच विकसित भारत व विकसित महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहेत” असे प्रतिपादन केले. या प्रसंगी सरपंच  सुरेश नाईक नवरे, उपसरपंच  सत्यशीला वाकुरे, ग्रा.पं.अधिकारी  बी. डी. काळे, ग्रा.पं.सदस्य  रमेश गादेकर, पोपट राऊत, दत्तात्रय कानडे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन  बब्रुवान वाकुरे, जि.प. शाळेतील शिक्षक  पडवळ सर, हंगे मॅडम, अंगणवाडी कार्यकर्ते  सुतार मॅडम, मदतनीस  कानडे ताई, सीआरपी  कोमल ताई कटकटी, जनाताई भोसले, अमोल गोरे, उद्धव प्रभाकर वीर, शाळेतील सर्व विद्यार्थी टिसचे आयोजक विद्यार्थी, ज्योती कांबळे, आगना अन्न मरियम, कृत्तिका बारले, संकल्प दत्ता, बुधभूषण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कांबळे व आभार प्रदर्शन ग्रामसेवक बी डी काळे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या बी.ए. समाजकार्य विभागातील विद्यार्थी  ज्योती कांबळे, आगना अन्न मरियम, कृत्तिका बारले, संकल्प दत्ता व बुधभूषण कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.

 
Top