धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील बेंबळी व केशेगाव येथे अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पाहणी केली. सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या पाहणीदरम्यान प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरीत कारवाई करावी. शासनाने ज्या निकषांनुसार मदत देणे अपेक्षित आहे ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकरी हे आपल्या राष्ट्राचे कणखर आधारस्तंभ आहेत. त्यांच्या घामाने सिंचन झालेल्या मातीतूनच महाराष्ट्राची भाकरी तयार होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने तात्काळ उभे राहून मदतीचे हात पुढे करणे ही काळाची गरज आहे. असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रशासनाला सुनावले. यावेळी बेंबळी व केशेगाव येथील शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन खाँन, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ नळेगावकर, हाशमोद्दीन श्रीकर, सरपंच सुरज चव्हाण, मिनाज श्रीकर, सुरेश शिंदे यादीसह उपस्थीत होते.