भुम (प्रतिनिधी)- दिनांक-11 सप्टेबर वार गुरूवार रोजी जिल्हा परिषद हायस्कूल वालवड व जि. प. कें. प्रा. शाळा वालवड येथे 115 कीटचे वाटप करण्यात आले.
सेवा सहयोग फाऊंडेशन मार्फत राज्यातील गरजू व होतकरू विद्यार्थीच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करून त्यांचे शिकणे सुलभ आणि सुकर करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये शैक्षणिक विकास, शैक्षणिक साहित्याचे वाटप, भौतिक विकास, तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास,महिला सक्षमीकरण करण्यासाठी महत्वाचे ठरतात. सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई हे गेली 16 वर्षापासून सामाजीक कार्य औद्योगीक क्षेत्रातील सामाजीक जबाबदारी अंतर्गत नित्य नियमाने करत आहेत. यामध्ये वालवडे हायस्कूल व केंद्रीय शाळेमध्ये 400 च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याठिकाणी वालवड व पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी 1ली ते 10 वी मध्ये शिक्षण घेतात. त्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण हे गुणवत्तापूर्ण देण्यासाठी हायस्कुल व शाळेतील शिक्षक कटीबध्द आहेत. या शाळेला शैक्षणिक किट मिळवून देण्यासाठी सेवा सहयोग फाउंडेशनचे जिल्हा प्रतिनिधी व पवारनगर शाळेचे शिक्षक विनोद सुरवसे व भूम तालुका समन्वयक संतोष तोडकरी तसेच समन्वयक विनायक शिंदे यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच देवळकर ताई व उपसरपंच मोहिते सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष औदुंबर काटे उपाध्यक्ष समाधान मस्के सदस्य दुधाळ, समाधान बनसोडे, सावंत, पाटील व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट ऑफिसर मनीषा खटाळ मॅडम व हनुमंत खटाळ व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होतेफ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर रोकडे यांनी केले व आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री लालासाहेब खरात सर यांनी मानले.