भूम (प्रतिनिधी)- भूम बस स्थानकावर सुरक्षारक्षक व पोलीस पोलीस प्रशासनाचा कर्मचारी नसल्यामुळे गर्दीच्या वेळेस मुलींना छेडछाड ,चोरीचे प्रमाण वाढले आहे .छेडछाड करणाऱ्या वर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवासी वर्ग मधून होत आहे .

बस स्थानकामध्ये स्थानक प्रमुख ,सुरक्षारक्षक ,व पोलीस प्रशासनाचा कर्मचारी नसल्यामुळे टवाळखोर ,चोरटे संधी साधत असून याच्याकडे मात्र एसटीचे अधिकारी ,पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे .मागील काळात आगर प्रमुखांनी अवैध वाहतूक ,अवैद्य उद्योगधंदे ,व इतर विषयी पोलीस प्रशासनाला एसटी आगाराच्या वतीने पत्र देण्यात आले होते .मात्र त्या पत्राला पोलीस प्रशासनाकडून केराची टोपलीच मिळाली .असे दिसून येत आहे .ना कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याचे पहावयास मिळाले नाही .बस स्थानकावर टवाळखोर बिनधास्तपणे शाळा व कॉलेज सुटल्यानंतर विद्यार्थिनींना छेडछाड करण्याचे प्रकार चालू आहेत .मात्र कोणावर कारवाई होताना दिसत नाही .भूम बस स्थानकावर सुरक्षारक्षक ,स्थानक प्रमुख ,तसेच पोलीस प्रशासनाचा कर्मचारी कायम द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यासह पालक वर्गातून व प्रवासी वर्गातून होत आहे.


 
Top