भूम (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी निघाल्याने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे .राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदेच्या निवडणुकी संदर्भात सुरू केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेला विभागीय आयुक्तांनी अंतिम मंजुरी दिल्याने भूम नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. 31 ऑगस्टपर्यंत प्रारूप प्रभाग रचना साठी हरकती मागवल्या होत्या. परंतु एकही हरकत न आल्याने नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी पुढील नियोजन सोयीस्कर होणार आहे.
भूम शहरामध्ये एकुण 10 प्रभाग असणार आहेत. 20 नगरसेवक असणार आहेत. यामध्ये 10 महिला 10 पुरुष असणार आहेत. भूम शहराची लोकसंख्या सन 2000 च्या जनगणनेनुसार 22077 असून यामध्ये अनुसूचित जाती लोकसंख्या 3462 तर अनुसूचित जमाती 612 आहे .प्रत्येक प्रभागामध्ये कमाल 2208 किमान 1987 इतकी लोकसंख्या आहे .पालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा मागील जनगणनेनुसार आणि नगरपरिषद क्षेत्राची प्रंगणक गटनिहाय एकूण लोकसंख्या ,अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या व प्रगणक गटाचे नकाशे या बाबी विचारात घेऊन तयार केली आहे.
अशी आहे प्रारूप प्रभाग रचना
शहराची हद्द वाढ झाल्याने आठ ऐवजी दहा प्रभाग झाले असून सदस्य संख्या 20 राहील .प्रभागाची व्याप्ती ,तेथील लोकसंख्या नुसार झाली आहे. प्रभाग एक सर्वे नंबर 99 ते 128 पर्यंत न प हद्द .ते आयटीआय पर्यंत .गोलाईपर्यंत .शितल शहा घर ,एसटी डेपो ,गजानन महाराज मंदिर.
प्रभाग क्र. दोन. गोलाई कल्याण बागडे लोकांचे दूध संघ न प हद्द .अलम प्रभू देवस्थान .गालिब नगर ,तहसील कार्यालय ,कोर्ट ते गोलाईपर्यंत. प्रभाग क्र 3ओंकार चौक ,हॅलो प्रभू रोड, अनिल दाते घर ,मजीद ते अलंमप्रभु मंदिर ,जवाहरलाल नेहरू उद्यान ,राजेंद्र खोसे घर ते ओंकार चौक, प्रभाग क्र 4. लालमियॉ कुरेशी घर ,ग्रामीण रुग्णालय,गोलाई , संभाजी महाराज शॉपिंग सेंटर ,वाचनालय ,चौंडेश्वरी समाज मंदिर , डॉ . खोले घर ,रज्जाक बागवान घर.
प्रभाग क्र 5 . स .न 44 श्रीकांत गाढवे घर ,मुस्लिम कब्रस्तान ,एसटी स्टँड ,लक्ष्मी रोड ,मांढरदेवी शॉपिंग सेंटर ,सलीम बागवान घर ते संजय होळकर ,कल्याण स्वामी मठ ,मधुकर भोळे घर ,थोरात ते लेढी नाला न प हद्द. प्रभाग क्र 6 .बानगंगा नदी ते ,सिद्धेश्वर उद्यान, चिंचोली चौक ,धाकटी वेस , गोपाळ मिसाळ घर ,धनंजय चौधरी घर ,सर्वजनिक तालीम संघ ,बाळासाहेब मडके ते वडगाव रोड , चिंचोली चौक बानगंगा नदी. प्रभाग क्र . 7 .बानगंगा नदी पुंडलिक गायकवाड घर ,मनोहर साठे घर ,जमीर आदम शेख घर,संतोष रोकडे घर ,रमेश पालखी घर ,विजयकुमार बागडे घर ,शिवाप्पा उंबरे घर , पौळ घर ,बाणगंगा नदी. प्रभाग क्र 8 .घर नं . 8882 ते दादाराव चौधरी घर ,माणिक माळी ,हनुमान मंदिर धाकटी वेस , लक्ष्मण त्रिंबके घर ,मन्यार किराणा ,पृथ्वीराज होगाडे घर ,फिसके घर , खुलेनाट्यगृह ,परंडा रोड ,रोहिदास सुळ घर ,दत्ता सुपनर घर ,बाणगंगा नदीचे नवलगाव रोड. प्रभाग क्रमांक . 9 .नरसोबा मंदिर ,शांता शाळू घर ,रघुनाथ होगाडे घर ,नारायण बागडे घर ,एसबीआय बँक ,शब्बीर सय्यद घर ,आलमप्रभु नाला ,स्वामी घर ,नाट्यगृह ते मधुकर टकले घर, प्रभाग क्रमांक 10 .कोंडीबा डोके घर ,दीपक मैदर्गे घर , चांडगे घर ,चंदनशिवे घर , स न 301 न प हद्द ,माने घर ,परंडा रोड,प्रशांत शेटे घर ,मज्जिद ते आलमप्रभू नाला ,औदुंबर जाधव घर ,कोंडीबा डोके घर, याप्रमाणे शहरातील प्रभाग रचना करण्यात आली आहे.