उमरगा (प्रतिनिधी)- रोटरी क्लब उमरगाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून नेशन बिल्डर अवार्ड वितरण समारंभ संपन्न झाला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा च्या सांस्कृतिक सभागृहघेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी तसेच प्रमुख अतिथी उपजिल्हाधिकारी राहुल शेवाळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय मेनकुदळे, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, सचिव प्राध्यापक राजू जोशी प्रोजेक्ट चेअरमन रो.कमलाकर भोसले, अजित गोबरे, अनिल मदनसुरे, संजय ढोणे  यांची उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील 8 शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्ड पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच कासय्या स्वामी शिक्षण सेवा पुरस्कार देऊन तालुक्यातील एका शिक्षकास गौरविण्यात आले.

पुरस्कार प्राप्त शिक्षक खालील प्रमाणे 

प्रा.डॉ. संजय दुलंगे आदर्श महाविद्यालय, उमरगा, प्रमोद मोरे जि. प. प्रा. शाळा, कुन्हाळी, रमेश भुरे म. गांधी विद्यालय, केसरजवळगा, रवी पाटील  श्रीकृष्ण विद्यालय, गुंजोटी, मीनाक्षी जाधव  कुमारस्वामी प्राथमिक विद्यालय, उमरगा, व्यंकट गुंजोटे भारत विद्यालय, माकणी, गुंडू दूधभाते ज्ञानेश्वर विद्यालय, तुरोरी, बबिता महानोर जि. प. शाळा, करवंजी तसेच कासय्या स्वामी गुरुजी शिक्षण सेवा पुरस्कार गुरु बिराजदार यांना देण्यात आला.

रोटरी क्लबच्या आणि वतीने घेण्यात आलेल्या गौरी आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक ऊज्वला अमोल थोरे, तुरोरी, द्वितीय क्रमांक पुष्पा विठ्ठल जोगी उमरगा, तृतीय क्रमांक सुनिता चंद्रकांत जाधव, गुंजोटी,उत्तेजनार्थ सागरिका  वेदपाठक उमरगा, सुनिता श्रीमेवार, उमरगा.

या नेशन बिल्डर अवॉर्ड कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे पदाधिकारी शिवानंद दळगडे,  शमीम पठाण, नितीन होळे, प्रशांत कुलकर्णी, कलंशेट्टी पाटील, अमर परळकर, रवी आळंगे, डॉ. आळंगेकर, परमेश्वर सुतार, शिवकुमार दळवी, संजय अस्वले, कविता अस्वले, पुष्पलता पांढरे, सोमशंकर महाजन, युसूफ मुल्ला, शिव शंकर होन्द्रे, धनंजय वेदपाठक, देवाप्पा सूर्यवंशी, वंदना मेनकुदळे, कुंदा जोशी,सविता दळवी, पर्वती माशाळकर, सागरीका वेदपटक, ज्योती सातपुते, मनीषा गुंजोटे, प्रीती पाटील तसेच तालुक्यातील अनेक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कुटुंबीय अनेक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर धनंजय मेनकुदळे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देशमुख यांनी तर आभार रोटरीचे सचिव राजू जोशी यांनी मानले.

 
Top