धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने दोन दिवसीय धाराशिव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पहिल्यादिवशी निमंत्रित कवींचे राज्यस्तरीय कवीसंमेलन पार पडले. या संमेलनास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुसया दिवशी भूपाळी ते भैरवी या अस्सल मराठमोळ्या लोककलांचा रांगडा आविष्कार कार्यक्रम पार पडला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्याचा ऐतिहासिक गौरव सादर करणारा पोवाडा सादर करण्यात आला. या कार्यक्रमासही नागरिकांचा उदंड प्रतिसाद दिला.
शहरातील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. तत्पूर्वी दुसया दिवशीच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मित्राचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, निवासी जिल्हाधिकारी शोभा जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाउ कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, राष्टवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळ, ॲड. मिलिंद पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष अमित शिंदे, व्यापारी संघाचे लक्ष्मीकांत जाधव, धाराशिवच्या तहसिलदार मृणाल जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक, उपाध्यक्ष जी. बी. राजपुत, सचिव रविंद्र केसकर, माजी अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, महेश पोतदार आदींची उपस्थिती होती.
सांगली येथील संपत कदम यांच्या सांस्कृतिक पथकाच्या भूपाळी ते भैरवी राज्यात आणि देशात गाजत असलेल्या कार्यक्रम झाला. यामध्ये पहाटेच्या भूपाळीपासून रात्रीच्या लावणीपर्यंत महाराष्ट्राच्या लोककलांचा अस्सल मराठमोळा रांगडा आविष्कार त्यांनी सादर केला.