वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे आज रोजी ग्रंथालयामध्ये ग्रंथालयाचे जनक पद्मश्री डॉ.एस.आर रंगनाथन यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.शामसुंदर डोके,ग्रंथपाल प्रा.राहुल कुलकर्णी,ग्रंथालय सल्लागार समिती सदस्य प्रा.डॉ बालाजी देवकते, प्रा.डॉ संतोष जामगे, प्रा.एम.डी उंदरे उपस्थित होते. 

या वेळी बोलताना प्रा.शामसुंदर डोके म्हणाले कि, डॉ.एस.आर रंगनाथन हे बनारस हिंदू विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून ग्रंथालय चळवळी मध्ये मोलाचे योगदान दिले तसेच ग्रंथालय चळवळीला योग्य दिशा व बळ दिले वेद काळापासून ग्रंथाचे महत्व असून आपल्या संतांनीही विविध ग्रंथामधून समाजाला दिशा देण्याचे काम केले त्यांनी पुस्तकाच्या वर्गीकरणाची पद्धत शोधून काढली असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन प्रा.राहुल कुलकर्णी यांनी केले तर प्रा.एम.डी उंदरे यांनी आभार मानले कार्यक्रमाला प्रा.के.डी गुंड,प्रा.डॉ नेताजी देसाई,प्रा.डॉ महेश गुरमे, प्रा.प्रियंका गादेकर,श्री.सूर्यकांत धोत्रे,श्री.विपुल भालेराव,श्री प्रविण बारगजे विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.

 
Top