भूम (ंप्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 'हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान 2025' राबविण्यात येत आहे. भूम बसस्थानकात या अभियानाअंतर्गत भूम बसस्थानकात केलेल्या कामाचे परिक्षण लातूर विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांच्यासह पथकाने केले.

बसस्थानक परिसरातील सोयीसुविधांची पाहणी वरिष्ठस्तरावरुन करण्यात येत आहे. प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा, बसस्थानकातील दैनंदिन स्वच्छता, वृक्षलागवड, विविध कक्षाचे पथकाकडून परिक्षण करण्यात आले. या पथकात प्रवीण राठोड उपस्थित होते. भूम

बसस्थानक परिसरातील विविध कामांचे परीक्षण केले. परंडा बसअगारामार्फत लोकसहभागातून व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून केलेल्या बसस्थानक स्वच्छता व सजावट, प्रवाशांना विविध सवलतीचे माहिती देणारे फलक, बसचे वेळापत्रक, सुलभशौचालयातील स्वच्छता, दर फलक व सुंदर बगीचाची पाहणी केली. तसेच प्रवाशांसोबत संवाद साधून सूचना जाणून घेतले. यावेळी आगर प्रमुख विलास शिंनगारे, वाहतूक निरीक्षक श्रीकांत सुरवसे, गणेश वाघमारे उपस्थित होते. आगारप्रमुख उल्हास शिनगारे व वाहतूक निरीक्षक श्रीकांत सुरवसे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण मुकेश भगत उपस्थित होते.


 
Top