तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे पोर्णिमा व राखी पोर्णिमा शनिवार दि. 9 ऑगस्ट रोजी पारंपारिक पध्दतीने साजरी करण्यात आली. श्रावणी पोर्णिमा पार्श्वभूमीवर दिवसभर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज बहिणीने भावाला राखी बांधुन रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा केला. पोर्णिमा पार्श्वभूमीवर राञी मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर महंत वाकोजीबुवागुरु तुकोजी यांनी आपल्या उपरण्यात जोगवा मागितल्या नंतर पोर्णिमा धार्मिक विधीचा सांगता झाला.