धाराशिव (प्रतिनिधी)-  पोलीस अधीक्षक, धाराशिव शफकत आमना यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नॅशनल हायवे 52 जवळील भवानी चौक ते अहिल्यादेवी होळकर चौकाकडे जाणारे रोडलगत असलेल्या गाझी हॉटेलच्या बाजूला पत्राचे शेडमध्ये काही इसम तिरट मटका नावाचे जुगार खेळत व खेळवीत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक आमना यांनी खास पथक नेमून जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या प्रकरणात 10 लाख 58 हजार 185 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पथकाने नमुद ठिकाणी जावून छापा टाकला. तेथे काही इसम गोलाकार बसून तिरट, मटका नावाचे जुगार खेळत असतांना मिळून आले. सर्फराज मकसुद कुरेशी, जुबेर जमील शेख, श्रीकांत बाबासाहेब शिंदे, पाशा कमाल पटेल, अजमतुल्ला जब्बार शेख, अमोल प्रकाश देढे, अमीर करीम सय्यद, सागर मारुती भांडवले, आबेद अब्दुल करीम शेख, रविंद्र मैंदाड सर्व रा. धाराशिव हे सर्व लोक तिरट, मटका जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. नमुद इसम हे रोख रक्कम सह मोबाईल फोन, वाहने व जुगाराचे साहित्यासह असा एकुण 10 लाख 58 हजार 185 रूपये स्वत:चे कब्जात बाळगलेले असताना पथकास मिळून आले. यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम- 4,5 अन्वये धाराशिव शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगोले, पोलीस हावलदार तांबे, शेख, लोखंडे, भोजगुडे सोबत क्यु.आर.टी. पथक यांचे पथकाने केली आहे.

 
Top