तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहगाभाऱ्याच्या जिर्णोद्धारामुळे 20 ऑगस्टपर्यंत बंद असलेले धर्मदर्शन व देणगी दर्शन आता पुन्हा सुरू होत आहेत. मंदिरातील काम पूर्ण झाल्याने गुरुवार दि. 21 ऑगस्टपासून दर्शन व्यवस्था नियमित होणार असल्याची माहिती प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी दिली. श्रावणमासाच्या अखेरीस भाविकांची प्रचंड गर्दी वाढली असून दर्शनासाठी 3-4 तासांचा वेळ लागत होता. परंतु आता दोन्ही रांगा पूर्ववत सुरू झाल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. देवीभक्तांसाठी ही बातमी दिलासादायक ठरणार आहे.