मुरुम (प्रतिनीधी)- भारत शिक्षण संस्था संचलित शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे राष्ट्रीय राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला . संपुर्ण देशात 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणुन साजरा करण्यात येत आहे . या वर्षीची थीम “ जय विज्ञान जय अनुसंधान आर्यभट्ट ते गगनयान “ भारताच्या भूतकाळातील आत्मविश्वास आणि भविष्यासाठीचा संकल्प दोन्ही प्रतिबिंबित व्हावे यासाठी हा थिम घेण्यात आला .
या प्रसंगी कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले अध्यक्षस्थानी होते . सरांनी आपल्या भाषणात भारतांनी चंद्रयान - 3 मोहिम व भारतानी चंद्रावर ठेवलेले पाऊल आज देशाची तुलना विकसित, प्रगत राष्ट्रासोबत केली जात आहे या बदल त्याचा संपुर्ण इतिहास सरांनी सांगितला. तसेच जगात भारत चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा देश बनला आहे तसेच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला होय खगोलशास्त्र, विज्ञान- तंत्रज्ञान, गणित याचा अभ्यास प्राचीन काळापासूनच आपल्या देशात केला जात होता .चंद्रयान मोहिमेत अभ्यास करून 'इसरो' तिल सर्व शास्त्रज्ञांनी आपल्या ज्ञान, अभ्यास याच्या बळावर हे यश संपादन केले चंद्रयान मोहिमेचे, चंद्रयान - 3 यशस्विपणे पूर्ण केले तो ऐतिहासिक दिवस म्हणजेच 23 ऑगस्ट ' राष्ट्रीय अंतराळ दिन ' होय .भविष्यात भारत चंद्रयान -4 व सूर्ययान पण मोहिम चाचणी पूर्ण करणार आहे यासाठी सर्व शास्त्रज्ञांना हि मोहिम यशस्वी व्हावी यासाठी सरांनी शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमासाठी डॉ विलास इंगळे , डॉ पद्माकर पिटले, प्रा गुंडाबापू मोरे, प्रा शैलेश महामुनी, डॉ अशोक पद्मपल्ले, प्रा एम डी साळुंके प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेटस, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले तसेच सुत्रसंचलन कॅडेट सुशांत जाधव व आभार कॅडेट पंकज जमादार यांनी केले.